का होते असे?
ती वाहू लागते
अथांग त्या सागरात
वाट मागेच राहते
मंद वाराही जणू
छळू लागतो
मारवा मग
कोलाहल भासतो
उडू वाटे विहगासंगे
एकटे असावे तरीही
सोडून साऱ्या कक्षा
घेऊ उंच भरारी
असेल एक परी तिथे
फिरवेल तिची छडी
स्वप्ननगरीत त्या मग
गवसेल पुन्हा सवंगडी
Marathi Poetry by Jui Shirvalkar
का होते असे?
ती वाहू लागते
अथांग त्या सागरात
वाट मागेच राहते
मंद वाराही जणू
छळू लागतो
मारवा मग
कोलाहल भासतो
उडू वाटे विहगासंगे
एकटे असावे तरीही
सोडून साऱ्या कक्षा
घेऊ उंच भरारी
असेल एक परी तिथे
फिरवेल तिची छडी
स्वप्ननगरीत त्या मग
गवसेल पुन्हा सवंगडी