भरारी घे ना रे पाखरा
फुलोरा हा चहूकडे
गाती पक्षीही मंजुळ
सुंदरतेचा लेवून साज
दारी उभा तुझ्या श्रावण
तरी का नं सोडे उंबरा?
पहा बरे अस्मानात
परते चिऊ घरट्यात
सल काय उरी तुझ्या
जे आसू दाटले डोळ्यात
का हा उदास चेहरा?
का रुसले शब्द सारे
हरवला सूर कसा
का रे माझ्या मना
चैतन्यमय रव तुझा
आज मधुवंतीविण कापरा
झाली होती कालही
संध्या अशीच रम्य
आज तीच होऊनि कातरवेळ
करे ताल मज अगम्य
विरला कुठे तो सांजवारा?